कुंभोज परिसरात अडसाली ऊस लावणीचा वेग वाढला
कुंभोज,प्रतिनिधी( विनोद शिंगे):- कुंभोज तालुका हातकलंगले सह परिसरात सध्या अडसाली ऊस लावणी करण्याया शेतकऱ्यांचा धांदल उडाली असून मोठ्या प्रमाणात वाढणारी बियाणांचे दर त्याचप्रमाणे वाढलेली मजुरी पावसाचे कमी प्रमाण व खतांची वाढलेली दर यामुळे शेतकरी संकटात सापडले असल्याचे चित्र दिसत आहे
परिणामी कुंभोज परिसरात दहा हजार हेक्टर पेक्षा जास्त ऊस क्षेत्र असून गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाच्या क्षेत्रात घट झाली होती पण ना मी यावेळी पावसाने वेळेत हजेरी लावली आहे परंतु हातखंडे तालुक्यात सर्वत्र पाऊस पडतो मात्र कुंभोज परिसरात अजूनही पावसाने म्हणाव तितक्या प्रमाणात हजरेन लावल्याने शेतकरी वर्ग कुचमतच अडसाली उसाची लागण करत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या एक एकर ऊस लागवडीसाठी मजुरांचे साडेचार हजार ते पाच हजार रुपये दर केला असून बियाणांचा दर 120 ते 130 रुपये मुळी झाला आहे. परिणामी वाढणारे खतांची दर यामुळे शेतकरी सध्या हैराण झाला असून. अन्य पिकातून न मिळणारे उत्पन्न व कमी मोबदल्यात ज्यादा पीक देऊन जाणारे क्षेत्र यामुळे शेतकरी सध्या अडसाली ऊस क्षेत्राकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी येणाऱ्या काही दिवसात चांगल्या पद्धतीचा पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळा वर्तवत असून त्या अंदाजानुसार शेतकरी आपले हजारो रुपये मातीत गुंतवत असल्याचे चित्र सध्या कुंभोज परिसरात दिसत आहे.