कापशी ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा ९२ टक्के निकाल

    कापशी ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा ९२ टक्के निकाल

     

     

    नवे पारगाव : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित कापशी (ता. शाहूवाडी ) सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस १२ वी चा निकाल ९२ टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य दिलीप चरणे यानी दिली.
    परीक्षेला २४ विद्यार्थी बसले पैकी २२ उत्तीर्ण झाले.
    कॉलेजमधील पहिले तीन क्रमांक असे : आदिनाथ सागर लुगडे, रूपाली राजेंद्र चौगुले, प्रथमेश अविनाश शेळके. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य दिलीप चरणे, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. सतिश रत्नाकर (इतिहास , राज्यशास्त्र) प्रा . उत्तम शेळके (मराठी , समाजशास्त्र) , प्रा. सुजाता पुरीबुवा (इंग्रजी),
    प्रा. दिपाली पाटील (हिंदी) यांचे मार्गदर्शन लाभले.