डॉ.सायरस पूनावाला स्कूलचे 10 वीच्या परिक्षेत घवघवीत यश
पेठ वडगांव : येथील डॉ.सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचा DCPIS शैक्षणिक वर्ष 2023-25 या वर्षीचा 10 वीचा निकाल 100% टक्के लागला असून प्रथम कु. आदित्य अनिल पाटील (96.40%) व कु. आरुष अमोल गोवळकर (96.00%), द्वितीय कु.करणसिंह गुलाबराव पोळ (95.40%) व कु. ओम प्रवीण महाजन (95.40%), तृतीय कु. श्लोक किरण खटावकर (95.20%) हे गुणानुक्रमे पहिले तीन आले आहेत.
एकूण विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी 90% ते 100%, 17 विद्यार्थी 80% ते 89%, 24 विद्यार्थी 70% ते 79%, २७ विद्यार्थी 60% ते 69%, 26 विद्यार्थी 48% ते 59% अशा श्रेणीत गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या परीक्षेत 103 पैकी 103 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये 77 मुले आणि 36 मुलींचा समावेश आहे. स्कूलने 100% निकालाची परंपरा गेली आठ वर्ष जपली आहे. स्कूलमध्ये आयोजित केलेल्या विविध ऑनलाईन व ऑफलाईन Online,Offline चाचण्या , प्रति बोर्ड पॅटर्न Board pattern सराव परीक्षा, तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, लेखन सराव, ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा, चर्चासत्रे, अभ्यास शिबिरे, स्टडी मटेरियल, शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष आणि अभ्यासास पूरक वातावरण, विद्यार्थी दत्तक योजना, आदर्श उत्तर पत्रिका कशा लिहाव्यात याचे मार्गदर्शन, गतवर्षीच्या बोर्ड परीक्षेत व स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि अनुभव याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, संस्था सचिव व स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या(ताई) पोळ यांचे प्रोत्साहन तर स्कूलचे प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना माध्यमिक विभागप्रमुख सागर फरांदे, इन्चार्ज सौ.चित्रा हगलहोले, स्कूलच्या समुपदेशीका डॉ. माधवी सावंत यांच्यासह सर्व वर्गशिक्षक व विषय शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.