Home Breaking News डॉ.सायरस पूनावाला स्कूलचा CBSC 12 वीचा 100% निकाल

डॉ.सायरस पूनावाला स्कूलचा CBSC 12 वीचा 100% निकाल

डॉ.सायरस पूनावाला स्कूलचा CBSC 12 वीचा 100% निकाल

 

 

 

 

 

पेठ वडगांव :- येथील डॉ.सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचा DCPIS शैक्षणिक वर्ष 2023-24 ह्या वर्षीचा 12 वीचा निकाल 100% टक्के लागला असून प्रथम कु. अहान कौस्तुभ माडगुट (92.40 %), द्वितीय कु. सर्वेश राजेश शिंदे (91.00%) व कु. श्रेयश मदन कोराडे (91.00%), तृतीय कु. मल्हार समीर सातपुते (89.80%) हे गुणानुक्रमे पहिले तीन आले आहेत.

 

एकूण विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी 90% ते 100%, 30 विद्यार्थी 80% ते 89%, ३० विद्यार्थी 70% ते 79%, 15 विद्यार्थी 60% ते 69% , 1 विद्यार्थी 50% ते 59% अशा श्रेणीत गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. शैक्षणिक वर्ष  2023-24 च्या परीक्षेत 80 पैकी 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. स्कूलमध्ये आयोजित केलेल्या विविध ऑनलाईन व ऑफलाईन चाचण्या, प्रति बोर्ड पॅटर्न सराव परीक्षा, तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, लेखन सराव, ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा, चर्चासत्रे, अभ्यास शिबिरे, स्टडी मटेरियल, शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष आणि अभ्यासास पूरक वातावरण, विद्यार्थी दत्तक योजना, आदर्श उत्तर पत्रिका कथा लिहाव्यात याचे मार्गदर्शन, गतवींच्या बोर्ड परीक्षेत व स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि अनुभव याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे.

 

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, संस्था सचिवा व स्कूलच्या अध्यक्षा सौ.विद्या (ताई) पोळ यांचे प्रोत्साहन तर स्कूलचे प्राचार्य डॉ.सरदार जाधव यांच्यासह ए.एफ.पी.आय.चे चेअरमन विश्वास कदम, संचालक मेजर चंद्रसेन कुलथे यांच्यासह सर्व विषय शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.