Home Breaking News महिला सबलीकरणासाठी श्रमिक सेवा समितीच्या वतीने एक पाऊल

महिला सबलीकरणासाठी श्रमिक सेवा समितीच्या वतीने एक पाऊल

महिला सबलीकरणासाठी श्रमिक सेवा समितीच्या वतीने एक पाऊल

 

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी) :-कोल्हापूर येथील मंगळवार पेठ परिसरातील हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी व श्रमिक सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि. 6 दिसंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरि निर्वाण दिनानिमित्ताचे औचित्य साधून ऑफीसमध्ये विश्वकमी योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले. Camp मध्ये आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड इ. कार्ड ही करून देण्यात आले .

तसेच महिलांना ठुशी चे ट्रेनिंग, महिलांची पर्स शिवणकला ट्रेनिंग देण्यात आले, घरी महिलांना पर्स, परकर पोलके, विविध खणाचे फ्रॉक, इ. शिवण्यासाठी घरी महिलांना स्वय रोजगार अंतर्गत देण्यात आले. गेली 3 वर्षे कापडी पिशव्या शिवण्यासाठी दिल्या आहेत. या camp साठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना घरी रोजगार मिळावा, या साठी श्रमिक सेवा समितीच्या अध्यक्षा सौ. निर्मला प्रमोद कुराडे यांचे सांतत्याने प्रयत्न चालू असतात.

तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्या साठी त्या नेहमीच मदत करतात, यापुढेही अनेक नवनविन रोजगार महिलांसाठी राबवले जातील असे त्यांनी सांगितले आजच्या कॅम्प साठी सोनाली जाधव, कविता पाटकर, स्वाती सासणे, दिपाली तांबेकर, शोभा जाधव महीला इत्यादी महिला उपस्थित होत्या. ऑनलाइन फॉर्म चे काम कु. क्रांती मेढे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून करण्यात आली, संस्थेच्या अध्यक्षा सौ. निर्मला कुराडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.