इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अतुल आंबी, उपाध्यक्ष पदी बसवराज कोटगी
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या 2024-25 या वर्षासाठी अध्यक्षपदी अतुल आंबी, उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी, खजिनदारपदी महेश आंबेकर आणि सचिवपदी इराण्णा सिंहासने यांची एकमताने निवड करण्यात आली. संघाच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवत सर्व पदाधिकार्यांची निवड यंदाही बिनविरोध झाली.
नूतन कार्यकारीणी निवडीसाठी पत्रकार कक्षात बैठक पार पडली. मावळते अध्यक्ष संभाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नूतन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. यावेळी गुरव यांच्यासह सर्व सदस्यांनी संघाच्या यशस्वी कार्यासाठी नव्या कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या.
नूतन कार्यकारीणीमध्ये सदस्य म्हणून संभाजी गुरव, अनिल दंडगे, पंडीत कोंडेकर, चिदानंद आलुरे, रामचंद्र ठिकणे, भाऊसाहेब फास्के, डॉ. पांडुरंग पिळणकर, हुसेन कलावंत, सुभाष भस्मे, बाबासो राजमाने, धर्मराज जाधव, शीतल पाटील, शिवानंद रावळ, विजय चव्हाण, छोटूसिंग रजपूत, महावीर चिंचणे आणि सुभाष बोरीकर यांची निवड झाली.
संघाच्या वतीने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच, वर्षभरात विविध उपक्रम राबवून पत्रकारांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करण्याचा मनोदय नूतन पदाधिकार्यांनी व्यक्त केला. तर निवडीनंतर सर्व पदाधिकार्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.