Home पेठवडगांव बळवंतराव यादव विद्यालयात शाही दसरा महोत्सवानिमित्त  पारंपारिक दिन उत्साहात

बळवंतराव यादव विद्यालयात शाही दसरा महोत्सवानिमित्त  पारंपारिक दिन उत्साहात

बळवंतराव यादव विद्यालयात शाही दसरा महोत्सवानिमित्त

पारंपारिक दिन उत्साहात

 

पेठवडगाव,(प्रतिनिधी) : येथील बळवंतराव यादव विद्यालयात शुक्रवारी शासनाच्या नियमाप्रमाणे शाही दसरा महोत्सवानिमित्त पारंपारिक वेशभूषा दिनाचे व महाहादग्याचे आयोजन करण्यात आले होते. महाहादग्याचे पूजन व उद्घाटन प्राचार्य अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापिका मनिषा पोळ, पर्यवेक्षक मनोज शिंगे,पी.बी.पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख राहूल निचिते, प्रशांत भोरे ,मानसी बुवा, अश्विनी बंडगर, जिज्ञासा पाटील,सौ.एस.आर.चव्हाण प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी सर्व विद्यार्थिनींनी हादग्याच्या गाण्यावर फेर धरला. तसेच गरबा खेळण्यात आला. महाहादगा संपन्न झाल्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना खिरापत वाटप करण्यात आले.

पारंपारिक वेशभूषा दिनातंर्गत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आले होते. या दोन्ही कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले.क्रीडा विभाग प्रमुख संताजी भोसले, यशवंत शेवाळे, भीमसेन सनदी, संजय जाधव,केतन खटावकर, यांनी नियोजन केले.यावेळी विद्यालयाचे सर्व अध्यापक व अध्यापिका उपस्थित होते.