महाराष्ट्रातील कला संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम शाळा महाविद्यालयातून होते-मुख्याध्यापिका आर.आर.पाटील
पेठवडगाव,(प्रतिनिधी):-महाराष्ट्रातील कला संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम शाळा महाविद्यालयातून होते. श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई सचेतना फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर संस्कृती आणि रूढी परंपरा जपण्याचे काम केले जाते. असे प्रतिपादन वडगाव विद्यालय जुनियर कॉलेज तंत्र शाखा वडगावच्या मुख्याध्यापिका आर.आर. पाटील यांनी केले.
श्रीमती सुशीलादेवी मल्हाराव देसाई युवती सचेतना फाऊंडेशनच्या माध्यमातून वडगाव विद्यालय जुनिअर कॉलेजमधील मुलींच्यासाठी झिम्मा फुगडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे यांनी केले
पारंपारिक पोशाख परिधान करून व झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये अनेक संघाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. चव्हाण व पी. एस.मोहिते यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
माध्यमिक विभाग -प्रथम क्रमांक विभागून- तुळजा ग्रुप, रॉयल ग्रुप,द्वितीय क्रमांक शिवकन्या ग्रुप
ज्युनिअर कॉलेज विभाग – प्रथम क्रमांक – फेरीज ग्रुप,द्वितीय क्रमांक – क्वीन स्पोर्ट,तृतीय क्रमांक- बटरफ्लाय ग्रुप आदींनी यश मिळविले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई,पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई, चेअरमन प्रा. मंजिरी देसाई मोरे, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे, कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर , कौन्सिल सदस्य शिक्षक प्रतिनिधी अकबर पन्हाळकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षका यु. सी. पाखरे , तंत्र विभाग प्रमुख अविनाश आंबी,ज्येष्ठ शिक्षक दिलीप शेळके, महेश कुलकर्णी, आदी मान्यवरांसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका एस. ए. पाटील व एस. आर. पाटील यांनी केले.