Home कोल्हापूर जिल्हा जय भवानी दूध संस्थेस 8 लाख 35 हजार नफा- शहाजी बोरगे

जय भवानी दूध संस्थेस 8 लाख 35 हजार नफा- शहाजी बोरगे

जय भवानी दूध संस्थेस 8 लाख 35 हजार नफा- शहाजी बोरगे

 

नवे पारगाव: निलेवाडी (ता.हातकणंगले ) येथील जय भवानी दूध उत्पादक संस्थेस 8 लाख 35 हजार नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी बोरगे यानी 41 व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून दिली.

शहाजी बोरगे म्हणाले जयभवानी दूध सहकारी संस्था दूध उत्पादक संस्थेला एकूण आठ लाख पस्तीस हजाराचा नफा झाला असून हे फक्त सभासदांच्यामुळे शक्य झाले सभासदांना 7 टक्के लाभांश देण्यात येणार आहे त्यामुळे संस्थेने सभासदांचा हित जपण्याचा प्रयत्न केला आहे आर्थिक वर्षात संस्थेस जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा त्यावेळी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला . तसेच उत्पादकांना 7% लाभांश देणार असल्याचे चेअरमन शहाजी बोरगे यांनी सांगितले तसेच यावेळी इथून पुढच्या काळात उत्पादक सभासद मध्ये झाल्यास त्याच्या वारसांना एक हजार रुपये सहानुग्र अनुदान देण्याचा ठराव संमत करण्यात आला .यावेळी गाय दूध मध्ये प्रथम क्रमांक -विलास सखाराम कोरे द्वितीय क्रमांक-संजय राजाराम बोरगे तृतीय क्रमांक -सर्जेराव यशवंत जाधव म्हैस दूध प्रथम क्रमांक- विलास सखाराम कोरे द्वितीय क्रमांक ,-प्रकाश रंगराव भोसले तृतीय क्रमांक तुकाराम तातोबा जगदाळे या सर्वांचा सत्कार करण्यात आला

चेअरमन शहाजी बोरगे, सचिव संजय कोरे , यांची भाषणे झाली. यावेळी सुभाष भापकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ,चेअरमन शहाजी बोरगे , माणिक घाडगे चेअरमन हनुमान दूध संस्था संचालक मानसिंग उरूनकर, बबन टोपुगडे, सर्जेराव रामचंद्र जाधव , मानसिंग शेळके ,अमित करवडे , बाळासो सुर्यवंशी ,मालुताई जाधव , सर्जेराव जाधव ,बाबसो कोरे सचिव संजय कोरे व सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.