वडगाव विद्यालयामध्ये मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन

    वडगाव विद्यालयामध्ये मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन

     

     

     

     

    पेठवडगाव /(प्रतिनिधी):-वडगाव विद्यालय व जुनिअर कॉलेज तंत्र शाखा वडगावमध्ये श्रीमती सुशीला देवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन अंतर्गत आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या चेअरमन डॉ.सौ मंजिरी मोरे देसाई यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव विद्यालय शाळा समिती चेअरमन श्रीमती प्रविता शिवाजीराव सालपे होत्या.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. आर.आर.पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.
    कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. नीलांबरी महेंद्र देसाई मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करतांना
    मुलींनी आपल्या शरीराची काळजी योग्य पद्धतीने कशी घ्यायची याचे मार्गदर्शन केले .
    या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .आर .आर .पाटील ,उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे ,पर्यवेक्षिका सौ .यु. सी पाखरे,कौन्सिल सदस्य ए .ए .पन्हाळकर,तंत्र विभाग प्रमुख ए. एस आंबी
    परीक्षा विभाग प्रमुख डी .ए .शेळके जेष्ठ शिक्षिका
    सौ. पी .एस .मोहिते आदी मान्यवरांसह शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.ए.पाटील यांनी केले.तसेच आभार सौ .एस .एस .चौगुले यांनी मानले.
    फोटो कॅप्शन
    कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ.नीलांबरी महेंद्र देसाई मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करतांना शेजारी अन्य मान्यवर.