वीरशैव लिंगायत माळी समाज ट्रस्ट च्या अध्यक्षपदी अशोक माळी तर उपाध्यक्षपदी नागेश माळी
पेठ वडगांव (प्रकाश कांबळे):-पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथील वीरशैव लिंगायत माळी समाज ट्रस्टचे अध्यक्षपदी अशोक महादेव माळी यांची तर उपाध्यक्षपदी नागेश सखाराम माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी नूतन संचालक नारायण माळी,बाजीराव माळी, अमर माळी,बाळासो माळी, विजय माळी,रमेश माळी, तुषार माळी,राजेंद्र माळी,विजय माळी,मनोहर माळी, महादेव माळी तसेच माळी समाजातील लोक उपस्थित होते.