अजिंक्य तारा शिरोळ पथक आवाडे युवा सेना दहीहंडी बक्षिसाचे मानकरी
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-डॉ.राहुल आवाडे युवा सेना यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी इचलकरंजीत जल्लोषात.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने खेळला जाणारा उत्सव म्हणजे दहीहंडी. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी डॉ. राहुल आवाडे युवा सेना यांच्या वतीने इचलकरंजी येथील यशोलक्ष्मी मैदान, जुना कोल्हापूर नाका आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते व कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे,मोश्मी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिकात्मक दहीहंडी फोडून करण्यात आला. तसेच अजिंक्य तारा शिरोळ या पथकाने दहीहंडी फोडून 3 लाख 11 हजार रु. बक्षिसाचे मानकरी ठरले. आकर्षक नेत्रदीपक रोषणाई, विविधरंगी प्रकाशझोत व डीजेच्या ठेक्यावर बाल गोपाळा सह गोविंदांनी व प्रेक्षकांनी संपूर्ण यशोलक्ष्मी मैदानाचा परिसर गर्दीने खचाखच भरला होता.
यावेळी संजीव शिंदे, मधु शिंदे, आदित्य आवाडे, सानिका आवाडे, दिया आवाडे, समायरा आवाडे, नाना पाटील, राजू बोंद्रे, दिपक सुर्वे, राहुल घाट, तात्या कुंभोजे, सतीश मुळीक, इम्रान मकानदार, नितेश पोवार, अक्षय बरगे, शेखर शहा, बाळासाहेब माने, महेश पाटील, बाबासाहेब चौगुले, माणगाव सरपंच राजू मगदूम, अभय कश्मीरे, वैभव हिरवे, निलेश पाटील, विनायक बचाटे, किशोर पाटील, सुहास कांबळे, सरपंच राजेश पाटील, सरपंच शिवाजी पाटील, कोरोची सरपंच संतोष भोरे, वैभव पोवार, बबन मुरगुंडे, अजिंक्य रेडेकर, नागेश पाटील, सागर कम्मे, भारत बोंगार्डे, अविनाश कांबळे, अविनाश परीट, गुंडू गोरे, शशि नेजे, ओंकार सुर्वे, बिलाल पटवेगार, फईम पाथरवट, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सहभागी गोविंदा पथक यांच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.