कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे उपोषण स्थगित

    कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे उपोषण स्थगित

     

     

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने सेंट्रल किचन पद्धतीची अट रद्द व्हावी यासाठी शर्थीचे प्रयत्न आणि संघर्ष म्हणून आणि विविध मागण्या घेऊन २६ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरु आहे. याप्रसंगी उपोषण स्थळी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सेंट्रल किचन संदर्भातील त्रुटी रद्द करून घेण्याची आवाडे यांनी ग्वाही महिलांना दिल्याबद्दल महिलांनी उपोषण स्थगित केले.

    यावेळी ताराराणी महिला आघाडीच्या उर्मिला गायकवाड, अंजुम मुल्ला, भारत बोंगार्डे, अनिल शिकलगार, संघटनेचे अध्यक्ष सावंत वाहिनी, प्राचार्य ए. बी. पाटील, शोभा भाट, याशिन चौधरी, जैनब चौधरी, फरीदा सुतार, विजया काळे, भारती लोहार, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.