कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातील पूरग्रस्त लोकांच्यासाठी निवारा व जनावरांच्या साठी चाऱ्याची सोय- प्रवीण यादव
कुंभोज प्रतिनिधी):- कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातील लाटवडे भेंडवडे खोची तसेच अन्य पूरग्रस्त गावातील नागरिकांच्यासाठी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांच्या वतीने पूरग्रस्त परिस्थितीतून स्थलांतर करण्यासाठी वाहनांची व्यवस्था मोफत करण्यात आली असून, ज्या पुरग्रस्त कुटुंबांना निवार्याची सोय नाही अशा लोकांच्या राहण्याची सोय शरद सहकारी साखर कारखाना येथे असणाऱ्या जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव यांच्या फार्म हाऊसवर करण्यात आली आहे, तसेच सदर ठिकाणी जनावरांचा निवारा शेड ही तयार करण्यात आला असल्याची माहिती, कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात पूरग्रस्त परिस्थिती पाहणी दरम्यान माजी जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघात लाटवडे भेंडवडे खोची व अन्य बऱ्याचशाच गावात मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याने थैमान घातले असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना स्थलांतर करणे गरजेचे असून अशा स्थलांतरित कुटुंबाच्या राहण्याच्या तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांच्या माध्यमातून आपण करत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी दिली आहे. परिणामी स्थलांतर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांची मोफत सोय करण्यात आली असून त्यासाठी नागरिकांनी संपर्क साधण्याचे आव्हानही त्यांनी केले आहे.