Home Breaking News कुंभोज ; जयप्रकाश नगर मधील रस्त्यात असणारा MSEB चा डांब नागरिकांच्या...

कुंभोज ; जयप्रकाश नगर मधील रस्त्यात असणारा MSEB चा डांब नागरिकांच्या डोक्याला ताप

कुंभोज जयप्रकाश नगर मधील रस्त्यात असणारा  MSEB चा डांब नागरिकांच्या डोक्याला ताप

 

 

कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे) :-कुंभोज तालुका हातकलंगले येथील जयप्रकाश नगर येथे रस्त्यात एम ई सिबीचा डांब मधोमध उभा केला असुन, त्यामुळे रस्त्यावर वाहतूक किंवा प्रवास करताना नागरिकांना समस्या निर्माण झाली असून. सदर डाब रस्त्यात असल्याने डाब काडण्यासाठी अनेक वेळा परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत कुंभोज व विद्युत वितरण कंपनीला वारंवार विनवणी केली आहे.

परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने सदर परिसरातील नागरिकांना अनेक गोष्टीसाठी डाब आडवा येत असल्याने नाहक त्रास होत आहे. परिणामी सदर डाबं लवकरात लवकर ग्रामपंचायतने योग्य ठिकाणी न हलवल्यास जयप्रकाश नगरीतील नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा सागर महावीर (भोरे दानोळी रोड जयप्रकाश नगर) यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की जयप्रकाश नगर मध्ये रोड आहे. त्या रोडवर मधोमध एम ई सीबीचा डांब आहे. कितीतरी वेळा ग्रामपंचायत व एम एस ई बी यांना सांगून सुद्धा मधोमध असणारा डांब हलविणे संदर्भात कोणताही कारवाई झाली नाही. गल्लीतील नागरिकांना ए जा करताना सदर डाबांचा त्रास होतो. किंवा घराचे बांधकाम निघल्यास सहित्याची वाहतूक करताना नाहक त्रास होतो. याबाबत एम एस सी बी व ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिला होता परंतु त्यावर कोणीही ठाम निर्णय घेतला नाही.आता लहान मुले शाळेला जाताना डांबला दिलेली सपोर्टची तार आहे त्या तारेला येता जाता हात लावतात, पाऊस सुरू असल्याने त्यामध्ये करंट उतरून कोणताही अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत असून, ग्रामपंचायत कुंभोज व एम ई सीबीने तात्काळ सदर डांब रस्त्याच्या मधून हलवावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे.