खोची,भेंडवडे येथील पुरपरिस्थिची गटविकास अधिकारी मोकाशी यांचेकडून पाहणी
खोची,(भक्ती गायकवाड):- वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग व पाणलोट क्षेत्रासह खोची,भेंडवडे परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे या भागातून वाहत असलेल्या वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढच होत आहे.मात्र बुधवारी,गुरुवार सकाळ पर्यंत पाणी पातळीत संत गतीने वाढ होत होती.त्यामुळे दोन्ही गावात पाणी पातळी अजून इशारा पातळीतच आहे.खोची,भेंडवडे येथे मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी पात्रा बाहेर विस्तीर्ण झाले आहे.यामुळे शेकडो एकर शेती जमीन पाण्याखाली गेली आहे.जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.शेतात व गावात पाण्याचे व दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.वाढते पाणी व जोरदार पाऊस यामुळे चाऱ्या अभावी पशुधन अडचणीत सापडले आहे.
दोन्ही गावात अजून पूरबाधित होणाऱ्या कोणत्याही कुटुंबाने स्थलांतर केलेले नाही.मात्र वाढत्या पाणी पातळीवर सदर कुटुंबे लक्ष ठेवून आहेत.महसूल,ग्रामपंचायत,आरोग्य, महावितरण प्रशासन या ठिकाणी सर्तक आहे.खोची-दुधगाव व खोची स्मशानभूमी रस्ता वगळता इतर रस्ते व वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे.
दरम्यान पूर परिस्थितीची पाहणी व आढावा घेण्यासाठी हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी नारायण रामाण्णा,मंडल अधिकारी राजश्री पचंडी यांनी खोची, भेंडवडे येथील पूरग्रस्त भागांना भेटी देवून स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.यावेळी खोची तलाठी प्रमोद पाटील,ग्रामविकास अधिकारी आर.एस.मगदूम,कृषी सहाय्यक अमोल कोळी,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी,आरोग्य सहाय्यक असिफ मोमीन,कोतवाल हणमंत आडके,नितीन जाधव,भेंडवडे तलाठी प्रवीण तोडकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकाते, स्वप्निल नरुटे,परविन सनदे उपस्थित होते.