कलाकार महासंघ संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची पन्हाळा तालुका कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मोरे यांच्या उपस्थितीत पन्हाळा तालुका अध्यक्ष पदी कृष्णात निकम (के.पी) बोरपाडळे यांची निवड करण्यात आली. तर पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख पदी प्रविण जाधव शहापूर यांची निवड करण्यात आली आणि पन्हाळा तालुका महिला आघाडी अध्यक्षा म्हणून सौ.रूपाली गराडे देवाळे यांची निवड करण्यात आली.हि निवड देवाळे येथील महादेव मंदिर येथे संपन्न झाली.तसेच सर्व सभासदांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र (आयडेन्टिटी) वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मोरे, पन्हाळा तालुका संघटक तुकाराम लोहार. वारणा न्यूज चॅनल चे संपादक सुनिल पाटील.बोरपाडळे,देवाळे,शहापूर,आरळे, सावर्डे येथील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.