कोजिमाशि पतसंस्थेस 4 कोटी 87 लाखांचा नफा तर, ठेवीचा 600 कोटीचा टप्पा पूर्ण
कोल्हापूर, (प्रतिनिधी):-कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या कोजिमाशि पतसंस्थेस 31 मार्च 2024 अखेर निव्वळ नफा 4 कोटी 87 लाख व मार्च अखेर संस्थेने ठेवीचा 600 कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे. या आर्थिक वर्षात सभासदांना उच्चांकी लाभांश दिला जाणार आहे.अशी माहिती संस्थेच्या प्रधानकार्यालय येथे पतसंस्थेचे चेअरमन श्री उत्तम पाटील सर व तज्ञ संचालक श्री दादा लाड सर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. ते पुढे म्हणाले पतसंस्थेवरील सभासद व ठेवीदारांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे.
कोजिमाशि पतसंस्थेस 31 मार्च अखेरचा लेखाजोखा नुकताच सादर करण्यात आला. शिक्षक नेते व संस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब लाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची अर्थिक घोडदौड सुरू असून वाढती कर्ज मागणी व ठेवीचा तेवढाच ओघ हे सभासद व ठेवीदार यांच्या विश्र्वासाचे प्रतिक आहे. 31 मार्च 2024 अखेरीस संस्थेने 484 कोटी 12 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. गुंतवणूक 228 कोटी 2 लाख, निधी 44 कोटी 32 लाख, शेअर्स 28 कोटी 43 लाख . तसेच मयत सभासदांची कर्जमाफी 14 कोटी 6 लाख रुपयांची करण्यात आली आहे. एकूण कर्ज मर्यादा 42 लाख असून सभासद कर्ज 10 टक्के दराने आहे. त्याचबरोबर 1 जुलै 2024 पासून 9 टक्के व्याजदराने तातडीचे 2 लाख रुपये कर्ज वाटप सुरू केले आहे.
दरवर्षी सभासदांच्या यशवंत व गुणवंत पाल्यांचा सत्कार , कन्यादान साडीसाठी व कन्याजन्म स्वागतासाठी संस्थेमार्फत धनादेश व ठेवपावती तसेच सभासद कल्याण निधीतून वैद्यकीय कारणासाठी सभासदांना आर्थिक मदत केली जाते.
संस्थेकडे प्रधान कार्यालयासह 11 शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. सर्व शाखामध्ये संगणीकृत,सीसी टिव्ही कक्षेत व एस. एम.एस.सुविधा आहेत. संस्थेमध्ये लवकरच कोअर बॅकिंग सेवा सुरू होत आहे.
आपत्ती ग्रस्त सभासद व शाळांना आधार भेट वाटप करण्यात आले आहे . संस्था सुवर्ण महोत्सव प्रसंगी सभासदांना प्रवासी बॅग व शाळांना वॉल क्लॉक भेट दिलेली आहे. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन श्रीकांत कदम ,सीईओ जयवंत कुरडे व सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.