हिंदुतवादी आमदार राजासिंह ठाकूर यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर,(अविनाश शेलार यांजकडून) :-हिंदुत्वाचा बुलंद आवाज ओवेसीचा बाप, कट्टर हिंदुत्ववादी,भाग्यनगरचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी आई अंबाबाई व मातृलिंगाचे दर्शन घेऊन हिंदुराष्ट्र व्हावे अशी प्रार्थना केली. यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे त्यांची हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी जाहीर सभा घेण्याचा मनोदय व्यक्त केला त्याला त्यांनी संमती देऊन कोल्हापूरमध्ये भव्य आणि दिव्य जाहीर सभा घेण्याचे आश्वासन दिले. लवकरच सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांच्या सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थीत सेवावर प्रतिष्ठानचे संस्थापक व विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क अधिकारी श्री संभाजी उर्फ बंडा माधवराव साळुंखे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री किशोर घाडगे, सौरभ निकम, बजरंग दलाचे विशाल पाटील, अमोल पाटील, मराठा तितका मिळवावा कार्यप्रमुख योगेश केरकर, बजरंग दलाचे प्रशांत कागले, ऋण मातृभूमीचे पांडुरंग पाटील, सूरज माने राजूरे, राजेंद्र करांबे, सेवावर प्रतिष्ठानचे अनिल चोरगे, ओंकार खोंद्रे, छावा मराठा युवा महासंघाचे शितल कुमार जाधव सरनाईक, आदित्य उलपे, संकेत खोत, सुनील पाटील, अवधूत भाट्ये, स्वप्निल सावंत, सुहास शिंदे, सिद्धार्थ कटकधोंड, हर्ष मेस्त्री, करण काकडे उपस्थित होते.