Home Breaking News बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यास पोलीसांना यश

बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यास पोलीसांना यश

बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यास पोलीसांना यश

 

 

 

 

 

 

 

पेठ वडगाव,(मोहन शिंदे):- मिणचे (ता.हातकणंगले) येथील वसंत जाधव यांच्या वीटभट्टी वरील मजुराच्या घरातील विवाहीत सौ.काजल राकेश जाधव आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता Missing झाल्या होत्या. त्यांचा शोध घेण्यास वडगाव पोलीसांना अवघ्या काही तासातच यश आले आहे.

गुरूवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान विवाहित महिलेसह अल्पवयीन चार मुली शेजारच्या घरात जातो असे सांगून बाहेर पडल्या होत्या.

याबाबत विवाहित महिलेचे पती राकेश जाधव यांनी वडगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन तपासाची चक्री फिरवली.

तेथील स्थानिक रिक्षावाल्याची चौकशी केली असता बेपत्ता झालेल्या सर्वजण टोप येथील गंधर्व रिसॉर्ट वॉटर पार्क येथे गेल्याचे माहिती मिळाली.पोलिसांनी तात्काळ तीन पथके तैनात करून गंधर्व येथे चौकशी केली असता तेथून सर्व पन्हाळा गडाच्या दिशेने गेल्याची माहिती रिक्षावाल्याकडून समजली. त्यानंतर पोलिसाची पथके पन्हाळागडाच्या दिशेने रवाना झाली.गडाच्या आसपासची गावात तसेच हॉटेल्स, लॉजिंग येथे शोध घेत असता विवाहीत काजल जाधव आणि चार अल्पवयीन चार मुली वाघबीळ येथील एका पत्र्याच्या शेड जवळ अंधारात बसलेल्या आढळल्या.

त्या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरात कोणालाही न सांगता फिरायला गेल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पाटील,सपोनि पवार,पोसई खलील इमानदार यांचेसह जीतेंद्र पाटील, श्रीकांत दाभोळकर, अनिता फारणे, रामराव पाटील, मिलींद टेळी,योगेश राक्षे, प्रमोद चव्हाण,सुप्रिया बेंद्रे यांच्या पथकाने सदर कामगिरी केली.