कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघाच्या वतीने गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी
वाठार,(प्रकाश कांबळे):- महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती चक्रवर्ती सम्राट अशोककालीन बौद्ध लेणी पोहाळे येथे, कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सर्व लेणीमध्ये रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली, लेणी मधील चैत्यगृहामध्ये तथागत गौतम बुद्ध, चक्रवती सम्राट अशोक व महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाबुद्धवंदना घेण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे, कवी/लेखक,अनंत मांडूकलीकर ॲड,सरदार किरवेकर,सर बामसेफ चे जिल्हाध्यक्ष महेश बावडेकर, अविनाश साकेत, मनीषा कुरणे, ॲड,सरदार किरवेकर सर, यांनी लेणी विषयक माहिती दिली, यावेळी कराड,सातारा,कोल्हापूर, बेळगाव,अनेक जिल्ह्यातून लोक उपस्थित होते, तसेच कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ त्यांच्या वतीने उपासक/उपासिकांचे स्वागत करण्यात आले यावेळी
संस्थेचे संस्थापक आयु, मेजर अशोक कांबळे, प्रदीप सातपुते योगेश कांबळे, किरवेकर,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप सातपुते, जयश्री सातपुते बोलोलीकर शीतल कांबळे,मोहिंदर लिगाडे विनोद कांबळे, पत्रकार प्रकाश कांबळे, मंदा सोनताटे, रोहिणी कांबळे, सुकन्या लिगाडे, व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.