महाराष्ट्र राज्य असंघटीत क्षेत्र कामगार संघटना वतीने रक्तदान शिबिर व नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती सोहळा उत्साहात
वाठार,7 (प्रकाश कांबळे):- वाठार (ता.हातकणंगले) येथे महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटना यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व नूतन पदाधिकारी नियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी 70 रक्तदात्यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अंजुम देसाई होते तर प्रमुख वक्ते म्हणून ऍड बाळासाहेब पवार होते यावेळी बोलताना ते म्हणाले की या संघटनेने असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर घेऊन एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे संघटनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावे यासाठी आमच्याकडून तुम्हाला लागेल की मदत केली जाईल तसेच असं संघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे यासाठी आपण झटावे असे शेवटी म्हणाले.
संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब कांबळे म्हणाले कि असंघटित क्षेत्र कामगार संघटना ही महाराष्ट्र राज्यातील असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करते जिथे अन्याय होतो तिथे आमची संघटना सदैव पुढाकार घेऊन अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करते
अध्यक्षीय भाषणात बोलताना अंजुम देसाई म्हणाले की ही संघटना स्थापन केल्या नंतर पाहिले आंदोलन गांधीनगर शहरात केले तेथे कपड्याचे तसेच इतर दुकाने मिळून जवळजवळ 5 हजार दुकाने आहेत तेथील कामगारांना 6 ते 7 हजार पगार होता आम्ही उपोषण करून तेथील कामगारांना 10 पर्यंत पगार मिळवून दिला. या संघटनेत 15 हजार सभासद आहेत आमच्या संघटनेत जातिभेद नाही सर्वधर्मसमभाव असणारी संघटना आहे संघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटना सदैव झटत असते
यावेळी नूतन पदाधिकारी निवड मध्ये कोल्हापूर शहर महिला अध्यक्ष पदी सुप्रिया गोरे कोल्हापूर, जिल्हा उपाध्यक्ष पदी कुमार घाटगे (मिणचे),कोल्हापूर जिल्हा मीडिया विभागप्रमुख पदी प्रथमेश कांबळे(आळते), हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी लाजरस कदम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यवेळी काँग्रेस आय अल्पसंख्याक आघाडी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अन्सार देसाई, पत्रकार प्रकाश कांबळे,इरफान कुरणे, निळकंठ कालेकर, मोहम्मद देसाई, हजरत देसाई बबलू संनदी,निलेश कांबळे अमर कांबळे असंघटित क्षेत्र कामगार संघटनेचे हातकंणगले तालुका अध्यक्ष प्रतीक कांबळे, संगीता पाटील कागल (ता.अध्यक्ष),स्वरूपा खुरंदळे, शुभम घाटगे, विनोद हेगडे, अरुण कांबळे शिरिष शिंदे, राहुल पोवार, जावेद कुरणे, तौशिफ शेख, रमजान पटाईत विजय माने सुनील शिंदे जैनुल मुजावर, स्वरूप शिंदे, यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीने रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग जाधव यांनी केले तर आभार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मोहसीन पोवाळे यांनी मानले.