Home Breaking News आकाश पाटील यांनी दीक्षांत समारंभाच्या वेळी आई वडिलांना सल्यूट मारत दिली मानवंदना...

आकाश पाटील यांनी दीक्षांत समारंभाच्या वेळी आई वडिलांना सल्यूट मारत दिली मानवंदना     

आकाश पाटील यांनी दीक्षांत समारंभाच्या वेळी आई वडिलांना सल्यूट मारत दिली मानवंदना

 

 

कुंभोज,(प्रतिनिधी) :- धरणग्रस्त दुर्गेवाडी (ता. हातकणंगले) येथील आकाश महादेव पाटील याची राज्य राखीव पोलीस दलात  SRP निवड झाल्यानंतर 9 महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी राज्य राखीव पोलीस बल पुणे Pune येथे उपस्थित राहिले या मध्ये मिनी कमांडो कोर्स पूर्ण केला 9 महिन्याचे ट्रेनिंग पूर्ण होताच दीक्षांत संचालन समारंभ (शपतविधी) घेण्यात आला यावेळी सकाळी ठीक 7 वाजता प्रमुख अतिथी यांचे स्वागत करण्यात आले ठीक 7,30 दरम्यान शपथविधी घेण्यात आला त्यानंतर दीक्षांत संचालनास सुरुवात करण्यात आली दीक्षात समारंभाची सांगता होतात आकाश पाटील यांनी आपल्या आई-वडिलांना संचलन करत सल्यूट मारला त्यानंतर आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलग्याला सल्यूट मारत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

आकाश पाटील यांनीप्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले माझा मोठा भाऊ अतुल पाटील वन फोर्स कमांडो आहे त्याने ही पोस्ट त्याच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवली आहे .तो ज्या प्रमाणे अभ्यास करत होता त्याच प्रमाणे मी त्याचे अनुकरन करून अभ्यास करत होतो.