खोची ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुहास गुरव यांची बिनविरोध निवड
खोची,(वार्ताहर):-खोची (ता.हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मा.ए.बी.पाटील-प्रा.बी.के.चव्हाण- भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील गटाचे सुहास पंडित गुरव यांची बिनविरोध निवड झाली.उपसरपंच निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्नेहा पाटील होत्या.यावेळी ग्रामविकास अधिकारी आर.एस.मगदूम यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली.उपसरपंच पदासाठी सुहास गुरव यांचा एकमेव आल्याने त्यांची बिनविरोध झाली.निवडीनंतर प्रशासनाच्या वतीने सुहास गुरव यांचा सत्कार करण्यात आला.उपसरपंच निवड बैठकीस मावळत्या उपसरपंच रोहिणी पाटील,सदस्य अभिजीत चव्हाण,जगदीश पाटील,प्रमोद गुरव, पुनम गुरव उपस्थित होते.
उपसरपंच निवडीनंतर उपसरपंच सुहास गुरव समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वारणा दूध संघाचे संचालक दीपकराव पाटील,
भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, अभिजीत चव्हाण,डॉ.सुरेश गुरव,राम जाधव,सचिन पाटील,दादासो पाटील,आर.के.खाडे,आशिष गुरव, अनिल पाटील, धनाजी गुरव,विद्याधर केडगे,राहूल पाटील,रमेश गुंडवडे, पांडुरंग पाटील आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.