अंबपवाडीच्या उपसरपंचपदी शिवाजी खोत 

    अंबपवाडीच्या उपसरपंचपदी शिवाजी खोत

     

     

    नवे पारगाव :-  अंबपवाडी (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवाजी खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थान लोकनियुक्त सरपंच पांडुरंग खोत होते.

    . आघाडीत ठरल्याप्रमाणे संभाजी जाधव यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदाची निवड करण्यासाठी सरपंच पांडुरंग खोत यांनी विशेष सभेचे नियोजन केले. विहित वेळेत खोतगटाचे शिवाजी मारूती खोत यांचा व विरोधी गटाचे विमल चोपडे, अमिनाथ नायकवडी यांचे एकूण तीन अर्ज दाखल झाले होते. निवडीच्यावेळी विरोधी दोन्ही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने शिवाजी खोत यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्याची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्षांनी घोषित केले या वेळेला सचिव म्हणून ग्रामसेवक लक्ष्मण पाटील यांनी काम पाहिले.

    यावेळी माजी उपसरपंच प्रदिप खोत, पांडुरंग पाटील, राजेंद्र नायकवडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.