एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारचा सतत अन्याय, संदिप शिंदे

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

     

    कोल्हापूर (प्रतिनिधी) : एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर राज्य सरकारने सतत अन्याय केला आहे, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले नसल्याने कर्मचारी भिके कंगाल होत आहेत,
    या कर्मचाऱ्यांचे पालकत्व स्वीकारून एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करून कर्मचार्‍यांना चांगल्या सेवा- सुविधा मिळाल्या पाहिजेत, अन्यथा आगामी काळात मोठे आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शिरोळ येथे पत्रकार परिषदेत दिला,
    शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड एस.टी.आगार विभागाला राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी भेट देऊन पूर परिस्थितीची माहिती घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्यानंतर शिरोळ दत्त साखर कारखान्याच्या विश्रामगृह येथे पत्रकार बैठक झाली,
    यावेळी संदिप शिंदे म्हणाले, एस.टी. तोट्यात आहे असे शासन आम्हाला वारंवार सांगत असते, मात्र एस.टी. विभागाची सेवा हा सेवा उद्योग म्हणून स्वीकारला पाहिजे, शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड एसटी डेपो व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी महापुराच्या काळात एस.टी.चे नुकसान होऊ दिले नाही, ही बाब कौतुकास्पद आहे , गेल्या दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने कर्मचारी वेगळ्या मनस्थितीत आहेत, सातवा वेतन सुद्धा शासनाने लागू केलेला नाही, पगार नसल्याने पगारासाठी भीक मागावी लागत आहे, एसटी विभागातील तरुण चालक ,वाहक हे आत्महत्येच्या तयारीत आहेत, खऱ्या अर्थाने एसटीने ग्रामीण भागातील विकास साधला असून शिक्षण, उद्योग यासह लोकप्रतिनिधी निवड करण्यापर्यंत एसटी विभागाचे खरे योगदान आहे ,याचा विसर लोकप्रतिनिधींना झाला आहे,
    ते म्हणाले, राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवार्थ चांगले योगदान दिले असून कोरोना काळात 304 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, मात्र सरकारने साधे गुलाबाचे फुल देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचे धाडस दाखवले नाही अशी शोकांतिका व्यक्त करून राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी शिवशाही सारख्या बसेस आल्या आणि ग्रामीण भागात जीवनदायी असलेली एस.टी.बदनाम होऊन आर्थिक संकटात सापडली असेही ते म्हणाले,
    या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळ युनियनचे प्रादेशिक सचिव शिवाजीराव देशमुख , राज्य महिला सचिव शीलाताई नायकवडे , जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील , जिल्हा सचिव वसंत पाटील, जिल्हा महिला सचिव अरुणा पाटील ,पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष मनीषा मुळूक ,अश्विनी ठमाल ,रामचंद्र गोसावी, संतोष जाधव ,निनाद भोसले, रवींद्र भोसले, अरुण वास्कर , गणेश शेडबाळे ,चंद्रकांत पवार ,अशपाक नालबंद
    उपस्थित होते.
    दरम्यान एस.टी. महामंडळाचे युनियन राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत दत्त साखर कारखान्याच्या दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ सभागृह येथे विभागीय एस.टी. कर्मचाऱ्यांची बैठक झाली.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements