कोरोना महामारीच्या संकटात आर्थिक मदत केल्याबद्दल जावेद बागवान यांचा प्रदेश अध्यक्षांच्या हस्ते सत्कार

     

    इचलकरंजी : सण २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये  इचलकरंजी आगारा मध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार तब्बल तिन महिने रखडला होता. त्यावेळी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे इचलकरंजी आगार सचिव श्री.जावेद बागवान यांनी कोणतीही संघटना न पहाता’ ५० कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळा मध्ये आपल्या जवळील रोख रक्कम संघटनेच्या नावाखाली सहकार्यांना आर्थिक मदत केल्याबद्दल महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष श्री.संदीप (भाऊ)शिंदे व प्रांतिक उपाध्यक्ष श्री. शिवाजीराव देशमुख (सातारा) यांच्या हस्ते शिरोळ येथे सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कोल्हापूर विभागीय अध्यक्ष श्री.उत्तम पाटील (दादा),कोल्हापूर विभागीय सचिव, एस.टी. बँक सचांलक श्री. वसंतराव पाटील (मामा ) इचलकरंजी आगाराचे अध्यक्ष श्री.एम.बी. जमादार संघटनेचे जेष्ठ श्री. रमेश थोरवत (दादा) माजी अध्यक्ष श्री.शिवाजी माने तसेच महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हा सत्कार कार्यक्रम शिरोळ येथे संप्पन्न झाला.