Home कोल्हापूर जिल्हा परभणी घटनेच्या निषेधार्थ पट्टणकोडोली येथे रस्ता रोको करत गाव बंद आंदोलन

परभणी घटनेच्या निषेधार्थ पट्टणकोडोली येथे रस्ता रोको करत गाव बंद आंदोलन

परभणी घटनेच्या निषेधार्थ पट्टणकोडोली येथे रस्ता रोको करत गाव बंद आंदोलन

 

पेठ वडगांव, (प्रकाश कांबळे):- परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृती चा अवमान व पोलिसांच्या मारहाणीत वकिली शिक्षण घेत असेलला सोमनाथ सूर्यवंशी (वडर )समाजातील भीमसेनिकाच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलिसांनावर कारवाई व्हावी यासाठी आज पट्टणकोडोली येथे रस्ता रोको करत गाव बंद आंदोलन करण्यात आले.

यावेळी भीमसेनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.RPI कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आयटी सेल बाबासो कांबळे

बोलताना म्हणाले की तात्काळ कोम्बिंग ऑपरेशन थांबवून कस्टडीत असणाऱ्या भीमसेनिकाना सोडून द्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्तेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा अन्यथा संपूर्ण राज्यभरातून मंत्रालयवर मोर्चा काढू असा इशारा दिला त्यांनी दिला.

यावेळी रमेश जाधव सर यांनी संविधान हे आम्हाला वारसाने भेटलं आहे पण याचा उपभोग संपूर्ण देश घेतोय निव्वळ बौध्द समाजानेच संविधानाचा अवमान झाल्यावर रस्तावर उतरायच काय ?  इतरांनी पण संविधान आपल्यां न्याय हक्काचे आहे आपलं आहे म्हणून या लढ्यात सहभागी व्हायला पाहिजे असं मत मांडले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी प्रशासनास खडे बोल सुनावत प्रति प्रश्न विचारले खरंच हा गुन्हेगार माथेफिरू आहे का याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे हे तपासलं पाहिजे मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधक या प्रकरणाची सी .आय .डी चौकशी झाली पाहिजे आतापर्यंत आम्ही शांततेत आंदोलन मोर्चे करत आलोय दरवेळी असं होईल असं नाही या पुढे जर असा प्रकार घडला तर आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला.

या वेळी समस्त बौध्द समाज ,मातंग बांधव ,संविधान प्रेमी,भीमसेनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.      दिवसभर पट्टणकोडोली तील व्यापाऱ्यानी उधोग धंदे बंद करून शांततेत गाव बंद आंदोलनास सहकार्य केलं