केसरी कार्डधारकांना धान्य मिळावे -भाजप वतीने आमदार अशोकराव माने यांना निवेदन
पेठ वडगाव,(प्रतिनिधी): पेठ वडगाव (ता. हातकणंगले)येथील अनेक केसरी कार्डधारकांना धान्य मिळत नाही त्यांना धान्य मिळावे अशा मागणीचे निवेदन हातकणंगले तालुका भाजपा उपाध्यक्ष धनंजय गोंदकर यांच्या वतीने आमदार अशोकराव माने यांना देण्यात आले.
वडगाव शहरातील “अन्नसुरक्षा योजनेचा” चुकीच्या पद्धतीने सर्वे झाला असून गोरगरीब जनतेला धान्यापासून वंचित रहावे लागत आहे.यात सुमारे 2250 केसरी कार्डधारकांना ” खासबाब म्हणून ऑफलाइन पद्धतीने फॉर्म घेऊन पुरवठा व्हावा अशा मागणीचे निवेदन हातकणंगले विधानसभेचे नुतन आमदार अशोकराव माने यांना दिले आहे.
यावेळी उपस्थित तालुका ज्येष्ठ आघाडीचे अध्यक्ष विजू भाई शहा, तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने, युवा मोर्चा अध्यक्ष विकास कांबळे, जगदीश महादार, विनय खराडे, युवराज वाळवेकर, विशाल सनगर, राजू मिठारे,पियुष सावर्डेकर रणजीत पाटील, सुनील लाड, श्रीकांत ठिगळे, सागर लोळगे, रघुनाथ पिसे,पियुश शहा,अमोल गोंजारे यांचेसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.