Home Breaking News अशोकराव माने यांनी पद नसताना उभा केला विकास कामाचा डोंगर -मा.खासदार निवेदिता...

अशोकराव माने यांनी पद नसताना उभा केला विकास कामाचा डोंगर -मा.खासदार निवेदिता माने

अशोकराव माने यांनी पद नसताना उभा केला विकास कामाचा डोंगर -मा.खासदार निवेदिता माने

 

जनसामान्यांच्या प्रगतीसाठी अविरत झटणारे महायुतीचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने (बापू ) यांना निवडून आणण्यासाठी खासदार माने गटाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करावा असे आवाहन मा.खासदार निवेदिता माने यांनी केले.

महायुतीचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने (बापू ) यांच्या प्रचारार्थ रुकडी येथे खासदार माने गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.

निवेदिता माने म्हणाल्या, अशोकराव माने यांनी कोणतेही पद नसताना गेल्या पाच वर्षांमध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये कामाचा डोंगर उभा केला आहे. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या वर आली आहे. खासदार माने गटाच्या कार्यकर्त्यांनी ताकदिने काम करून अशोकराव माने (बापू ) यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे.

यावेळी प्रमुख मान्यवर जयसिंगपूरच्या मा. नगराध्यक्ष सौ.डॉ.निता माने, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य उद्योगपती मधुकर मुसळे (बापू ), उपस्थित होते.

या मेळाव्यास सौ.राजश्री संतोष रूकडीकर (सरपंच रुकडी ), शितल आदिनाथ खोत( डे. सरपंच रुकडी ), मा. जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार , मा. सरपंच रफिक कलावंत, भगवानराव पाटील (डे.सरपंच अतिग्रे ), किरण भोसले (मा.सरपंच रुकडी ) राजू अपराध (मा.सरपंच रुकडी ), मोहन इंगळे (व्हा. चेअरमन जवाहर पत संस्था रुकडी) उपस्थित होते

अशोकराव माने (बापू ) यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामाच्या पुस्तकाचे प्रकाशन निवेदिता माने  यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख कार्यकर्त्यांच्या मिटींगला रुकडी ग्रामपंचायत सदस्य राहुल माने, शिकंदर पेंढारी, समूवेल लोखंडे, जगन्नाथ दाभाडे, दिलीप इंगळे, राजू मुल्ला, राजू मोहिते, अनिल खोत, राजू सुतार,ग्रामपंचायत सदस्य रूकडी सौ शोभा कोळी, सौ. वनिता गायकवाड, सौ.सुजाता कांबळे, सौ. सरिता कांबळे,सर्व ग्रामपंचायत आजी, माजी सदस्य, प्रमुख कार्यकर्ते सुभाष पाटील, मोहन माने, काशिनाथ शिनगारे ( अध्यक्ष हातकणंगले धनगर समाज रूकडी )

प्रमुख कार्यकर्ते सुभाष पाटील, मोहनराव माने , राजू कोळी ( दर्गा तालीम अध्यक्ष ) कामना शिनगारे, अशोक बागडी, संपत माने, संभाजीराव गायकवाड, रमेश कांबळे, मोहन कांबळे, बाळू माने, कुमार पोळ, सुधीर पवार, पांडुरंग बनकर, सचिन हारगे, राजू माळी (अध्यक्ष माळी समाज ) ॲड. सुरज पाटील, गुलाब बांगडी, आदिनाथ कांबळे, सुरेश पवार, बाबासो कांबळे, सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.