Home Breaking News मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित- आमदार राजूबाबा आवळे

मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित- आमदार राजूबाबा आवळे

मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित- आमदार राजूबाबा आवळे

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-भादोले येथील भद्रेश्वर मंदिरातून आज प्रचार पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. भद्रेश्वराचा आशिर्वाद घेऊन नवीन कार्याची सुरूवात करणे ही आवळे परिवाराची परंपरा आहे. त्यामुळे आज असंख्य कार्यकर्त्यांसोबत भद्रेश्वराचा आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.

 

गेल्या ५ वर्षामध्ये केलेले विकासकामे घेऊन तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी मी तुमच्या दारी येणार आहे. हा प्रचार नुसता निवडणुकीचा टप्पा नाही तर तुमच्या विश्वासाला मान देऊन, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा संकल्प आहे.

 

तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि साथीने हातकणंगले मतदार संघाचा विकास निश्चितच गगनाला भिडेल हा विश्वास आहे. आज तुम्ही दाखवलेला प्रतिसाद, दिलेली साथ, ही फक्त पदयात्रेची सुरूवात नसून विजयाचा एल्गार असल्याची खात्री पटली. या शुभ प्रसंगी हातकणंगले जनतेच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध असेल अशी ग्वाही देतो.

 

यावेळी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीव किसन आवळे, माजी नगराध्यक्ष संजय आवळे, धोंडिराम पाटील, तालुकाध्यक्ष भगवान जाधव, माजी सरपंच शशिकांत खवरे, भिवाजी पाटील, सचिन पाटील, राष्ट्रवादीचे विजय भगवान पाटील, शिवसेनेचे सचिन जाधव, सुरेश पाटील, चंद्रकांत जामदार, भिवाजी पाटील, विजय पाटील, कपिल पाटील, मनोज माने, दिलीप पाटील, बी.एस.माने,

विकास पाटील, संकेत पाटील, गणी सनदे, गणी कवठेकर, हुसैन कवठेकर, समीर सनदे, अमर पाटील, बाजीराव सातपुते, शहाजी सिद, राजवर्धन पाटील, विजय गोरड आदींची उपस्थिती होती.