Home Breaking News जोरदार शक्तिप्रदर्शनाने आमदार राजूबाबा आवळे यांचा अर्ज दाखल

जोरदार शक्तिप्रदर्शनाने आमदार राजूबाबा आवळे यांचा अर्ज दाखल

जोरदार शक्तिप्रदर्शनाने आमदार राजूबाबा आवळे यांचा अर्ज दाखल

 

 

पेठ वडगांव,(मोहन शिंदे ) :- 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे व राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राजूबाबा जयवंतराव आवळे यांनी काल मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

याप्रसंगी खासदार छ.शाहु महाराज, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार राजीव आवळे,शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ,माजी लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे, संजय आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना आमदार राजूबाबा आवळे म्हणाले हातकणंगले मतदारसंघात गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि काँग्रेस पक्षाच्या जोरावर मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे भविष्यामध्ये काम करीत असताना मी तिन्ही पक्षांना सोबत घेऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसं करता येईल यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे आणि केलेला आहे.हातकणंगले मतदारसंघात सुमारे 255 कोटींची विकास कामे आतापर्यंत मी केली आहेत. हातकणंगले, पेठवडगाव हुपरी या गावांमध्ये क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

 

यावेळी भगवानराव जाधव, बाजीराव सातपुते,रमेश पाटोळे, बबनराव पाटील, सर्जेराव माने, अमर पाटील, कपिल पाटील,धोंडीराम पाटील, शंकर शिंदे, सचिनराव शिंदे, अर्चना दानवेकर, सविता पाटील , अनिता चव्हाण, गुरुप्रसाद यादव, अभिजीत गायकवाड, सचिन चव्हाण, आप्पासाहेब पाटील, सुरज जमादार,नितीन दिंडे, रमेश पाटील, प्रविन पाटील, सुरज पाटील,मयुर गायकवाड यांचेसह राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उभाटा गटाचे व यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.