Home Breaking News कातळेवाडी येथील शिवसैनिकांनी आमदार डॉ.विनय कोरे उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

कातळेवाडी येथील शिवसैनिकांनी आमदार डॉ.विनय कोरे उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

कातळेवाडी येथील शिवसैनिकांनी आमदार डॉ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

 

 

हातकणंगले, प्रतिनिधी( विनोद शिंगे):- कातळेवाडी (ता.शाहूवाडी) येथील शिवसैनिकांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे गट-तट सोडून शाहूवाडी तालुक्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कातळेवाडी येथील शिवसैनिकांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

सदाशिव दादु पाटील,बाबुराव दादु पाटील,कृष्णात सदाशिव पाटील,सरदार बाबुराव पाटील,सागर बाबुराव पाटील,सागर जाधव,बाळासाहेब जाधव,कैलास जाधव आदी शिवसैनिकांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील,कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड,विठलाई विकास सेवा सोसायटीचे चेअरमन युवराज पाटील,कातळेवाडी माजी सरपंच सागर उगवे,उपसरपंच भागोजी कातळे,जयवंत कातळे,बाबासाहेब कातळे,प्रशांत कातळे,राजाराम कातळे,आनंदराव कातळे,मारुती वरूठे आदी मान्यवर उपस्थित होते.