मानवी साखळी ने इचलकरंजीत बांगलादेश येथील हिंदू बाधवावरिल अत्याचाराचा निषेध
हातकणंगले,प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-बांगलादेश येथील सत्ता पलट झाल्यानंतर आपल्या हिंदु बांधवांवर अनंत अत्याचार करून त्यांच्या हत्या करत आहेत. तसेच हिंदुची धार्मिक ठिकाणांना उद्धवस्त करत आहे. ह्यासाठी जग भरातील इतर देश बध्याची भूमिका घेत आहे. अश्या घटना आपल्या देशातील काही राज्यामध्ये सातत्याने घटत आहे. आता आपला सनातन धर्म वाचवण्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकवटुन अश्या घटनाचा निषेध करावा व जगाला हिंदू ची शक्ती दाखवुन द्यावी. यासाठी आपल्या इचलकरंजी शहरामध्ये या निषेध करण्यासाठी मानवी साखळी आयोजित करण्यात आले होते. या मानवी साखळी मध्ये आमदार प्रकाश आवाडे, मा.जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, मोश्मी आवाडे व सानिका आवाडे यांनी सहभागी होत निषेध व्यक्त केला.
यावेळी ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, ताराराणी महिला आघाडी तसेच मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते.