Home Breaking News शाल्मली घाटगे-कणसे यांची पीएसआय पदी निवड

शाल्मली घाटगे-कणसे यांची पीएसआय पदी निवड

शाल्मली घाटगे-कणसे यांची पीएसआय पदी निवड

 

 

नवे पारगाव : निलेवाडी तालुका हातकणंगले येथील सौ शाल्मली घाटगे – कणसे यांची पी एस आय PSI पदी निवड झाली . महारष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत 2022 साली घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकालामध्ये महाराष्ट्रात मुलींच्या प्रवर्गातून निवड झाली आहे . सौ.घाटगे-कणसे या केमिकल इंजिनियर असून संसार करत हे यश मिळवले आहे . तात्यासाहेब कोरे वारणा कारखान्याचे संचालक  सुभाष कणसे रा. सातवे यांच्या त्या कन्या असून सचिन घाटगे यांच्या पत्नी आहेत व सचिन हे स्वतः एक यशस्वी इंजिनियर आहेत . अतिशय कष्ट , तसेच अभ्यासात सातत्य राखल्यामुळे हे यश मिळाल्याचे सौ घाटगे- कणसे सांगितले . त्याचबरोबर संसार करत करत हे यश मिळत असताना पती सचिन व घरच्यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच माझ्या आई-वडिलांचा सुद्धा माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे असे त्यांनी सांगितले . स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निलेवाडीतील पहिलीच महिला फौजदार झाल्यामुळे गावासह परिसरातून सौ घाटगे यांच्यावर अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.