Home Breaking News योग सेवा फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

योग सेवा फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

योग सेवा फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

 

 

पेठ वडगाव,(प्रतिनिधी) :-  येथील योग सेवा फाउंडेशनचा Yog Seva Foundation चौथा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

योग सेवा फाउंडेशन ची स्थापना दि.6 जुन 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन सादळे- मादळे (ता.करवीर) येथील डोंगरावर वृक्षारोपण करून करण्यात आली.

आज फाऊंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पेठ वडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मुर्तीस अभिषेक, शारदा विद्या मंदिर येथे वृक्षारोपण तसेच राजश्री छत्रपती शाहू मैदान येथल स्वच्छता मोहीम करून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, संतोष सणगर, प्रकाश कुलकर्णी,शाहजी इंगळे , मारूती पाटील, प्रशांत घाडगे,मोहन माळी, महेश्वर पाटील ,जगदीश कुडाळकर, मिलींद साखळकर, योगेश कुंभार,निवास पाटील, नितीन कुचेकर, समिर जाधव,राहूल काळे राजेंद्र बुरुड, सतिश ठाणेकर, शितल उपाध्ये,अंनत होणोले, पुंडलिक माळी, बेलेकर,चेतन खंडागळे यांचेसह नगरपालिकेचे कर्मचारी व योग सेवा फाऊंडेशनच्या महिला भगिनीं  उपस्थित होत्या.