विविध सामाजिक उपक्रमांनी शरद बेनाडे यांचा वाढदिवस साजरा
पेठ वडगाव : वाठार (ता.हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते,युवा उद्योजक शरद शंकरराव बेनाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उज्वल ध्येय युथ फाउंडेशन Ujwal Dhiya Youth Foundation च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
अंबप येथील अवधूत विशेष मुलांची शाळेत विद्यार्थ्यांना लागणारा पोषण आहार साहित्य व फळे वाटप, वाठार येथील नीवळे वसाहत मराठी शाळेत संगणक वस्तू भेट, तसेच गरजू लोकांना किराणा धान्य किट देण्यात आले. याप्रसंगी शरद बेनाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
यावेळी स्काय ग्लोबल ग्रुप चे मॅनेजर प्रदीप काळे सर,युवा उद्योजक अमोल क्षीरसागर, प्रभारी सरपंच गजेंद्र माळी, माजी उपसरपंच महेश कुंभार,ग्रा.प. सदस्य,सागर कांबळे ग्रा सदस्य सचिन कुंभार, दिलीप भाटे,सुरेश नरके, ज्येष्ठ, संजय मगदूम, नाना चौगुले,सागर पांगे, निवास कुंभार, उज्वल ध्येय युथ फाउंडेशन अध्यक्ष सुरज चौगुले, उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर, सचिव सुहास पोवार, कार्यकारी सदस्य गजानन खबाले,प्रमोद मगदूम, अमित सातपुते,क्रांती भोसले, मयूर कापसे, सतीश चौगुले,अर्जुन चौगुले, अजय पाटील, ओमकार जाधव,लखन गायकवाड, ओमकार पाटील, अभिजित पाटील, ओमकार मगदूम आदी उपस्थित होते.