Home आरोग्य 100 दिवसीय क्षयरोग तपासणी अभियानाची सुरुवात 

100 दिवसीय क्षयरोग तपासणी अभियानाची सुरुवात 

100 दिवसीय क्षयरोग तपासणी अभियानाची सुरुवात

 

पन्हाळा : आयुष्यमान आरोग्य मंदिर उंड्री येथे 100 दिवसीयक्षयरोग मुक्त अभियानाचे उद्घाटन वि.मं.उंड्री चे मुख्याध्यापक श्री.पी.डी.पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.आयुष्यमान आरोग्य मंदिर उंड्री चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव यांनी क्षयरोग नियंत्रण प्रतिज्ञा घेऊन सदर कार्यक्रमाची सुरुवात केली.

क्षय रोगाची उत्पत्ती,लक्षणे,खबरदारी,तपासणी आणि उपचारांची सविस्तर माहिती डॉ.अभिजीत जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. येत्या शंभर दिवसांमध्ये संशयित क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठीचे नियोजन,अभियानाचा,हेतू,तपासणीचे ठिकाण या सर्व गोष्टींची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.यावेळी रुग्णांची तपासणी करण्यात आली.