पेठ वडगावात चोरट्यांनी केले लाखोंचे दागिने व रोख रक्कम लंपास

    पेठ वडगावात चोरट्यांनी केले लाखोंचे दागिने व रोख रक्कम लंपास

     

     

     

    पेठ वडगाव,(प्रतिनिधी) : येथील सचिन दत्तात्रय कदम यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे 15 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

    पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,वडगाव येथील गणेश मंदिर समोरील सचिन कदम हे आपल्या कुटुंबासोबत शुक्रवारी पुणे येथे लग्नसमारंभात गेले होते. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री कदम यांच्या घराच्या बंद दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचा कोल्हापुरी साज,सोन्याचा हार, सोन्याचा गोल हार, लहान गंठण, मोहनमाळ, सोन्याच्या तीन अंगठ्या, कानातील फुले पाच जोड,एक सोन्याचा कार्प, चांदीचे लक्ष्मीचा छाप असलेले सात नाणी, लहान मुलांचे हातातील चांदीचे चार कडी,सोन्याच्या दोन रिंगा, लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याची दोन चेन, चार अंगठ्या असे एकुण 15 तोळ्याचे दागिने आणि 10 तोळे चांदीचे दागिने, व 2 लाख 7 हजार रोख रक्कम अशी एकुण 15 लाख रुपयांची जबरी चोरी केली आहे.

    या प्रकरणी सचिन कदम यांनी वडगाव पोलिसात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहे.