Home आरोग्य हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर, अनेक आजारांपासून ठेवते दूर

हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर, अनेक आजारांपासून ठेवते दूर

हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर, अनेक आजारांपासून ठेवते दूर

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-बाजारात हिवाळ्यातील हरभऱ्याची भाजी विक्रीस आली असून हिवाळ्यात थंडीची असल्याने अनेक खवय्ये हरभऱ्याची भाजी खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. हरभऱ्याचे पान तुरट, आंबट असते.
बाजारात हिवाळ्यातील हरभऱ्याची भाजी विक्रीस आली असून हिवाळ्यात थंडीची असल्याने अनेक खवय्ये हरभऱ्याची भाजी खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. हरभऱ्याचे पान तुरट, आंबट असते.

थंडीत विशेषतः ही भाजी उपलब्ध होते. हरभऱ्याच्या पानाच्या हिरव्या भाजीला आपण इंग्रजीत चिकपी लिव्हज असे म्हणतो. या भाजीचा उल्लेख अनेक आयुर्वेद ग्रंथात जसे चरक संहिता, राज निघंटू, वाग्भट संहितामध्ये आढळतो.

हिवाळ्यात तापमानात घट होत असताना त्याचा शरीरावरही परिणाम होत असतो. हरभऱ्याच्या भाजीत हरभऱ्याच्या पानामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक मँगनीज, कॉपर आदी मॅक्रोन्यूट्रिएंट्स आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

–आरोग्यासाठी फायदेशी–
या भाजीचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते जे हृदयाच्या आजाराचा बचाव करते.
यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
तसेच कॉपर आणि झिंकमुळे त्वचेची चमक वाढते.
भाजीतील आयर्न हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते.
तसेच मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी भाजी खूप फायदेशीर ठरते.

या भाजीत खूप अधिक प्रमाणात मिनरल्स आणि पॉवरफुल अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारींवर मात करता येते. भाजीत डाएटरी फायबर जास्त असल्यामुळे शरीरातील शुगर लेवल पटकन वाढ होत नाही. या कारणामुळे मधुमेहात याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. हरभऱ्याची भाजी मुगाच्या डाळीसोबत तयार करावी, जर कुणाला भाजीमुळे पित्त होत असेल तर पित्त होणार नाही.