Home कोल्हापूर जिल्हा स्व.धनाजी केर्लेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त “रक्तदान” शिबिरास भरघोस प्रतीसाद   

स्व.धनाजी केर्लेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त “रक्तदान” शिबिरास भरघोस प्रतीसाद   

स्व.धनाजी केर्लेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त “रक्तदान” शिबिरास भरघोस प्रतीसाद

 

पेठ वडगाव,मोहन शिंदे: येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय धनाजी केर्लेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त “रक्तदान” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सुरवातीस स्व.केर्लेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि रक्तदान शिबिरची सुरवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 102 रक्तदात्यांनी रक्तदान केल.

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्त ही अशी गोष्ट आहे की ती कृत्रिमरित्या बनविता येत नाही. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे. एका रक्तदात्यामुळे पाच लोकांचा जीव वाचू शकतो.                                        स्व.धनाजी केर्लेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन स्व.धनाजी केर्लेकर सोशल फाउंडेशन व मित्र परिवार यांनी केले होते. वडगाव व परिसरातील युवकानी या रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद दिला.

रक्तदान शिबिरास संजीवनी ब्लड बँक कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले.

 

🔲पुण्यस्मरणानिमित्त कौतुकास्पद उपक्रम–

वडगाव नगरीमध्ये सोमवारी कै.धनाजी केर्लेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण 102 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

रक्तदानाच्या माध्यमातून इतरांना जीवनदान द्यायचा हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम केर्लेकर परिवार व मित्रमंडळींनी घेतला. त्यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

कुटुंबातील दिवंगत मंडळींच्या आठवणींना, स्मृतीना या अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली देऊन त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे..

गौतम बागवडे- संजीवनी ब्लड बँक, जनसंपर्क अधिकारी कोल्हापूर.