Home पेठवडगांव बळवंतराव यादव विद्यालयात मॅट कुस्ती मैदानाचे उदघाटन

बळवंतराव यादव विद्यालयात मॅट कुस्ती मैदानाचे उदघाटन

बळवंतराव यादव विद्यालयात मॅट कुस्ती मैदानाचे उदघाटन

 

पेठ वडगाव : येथील बळवंतराव यादव विद्यालयात मॅटवरील कुस्ती मैदानाचे उदघाटन झाले.उद्घघाटन संस्था अध्यक्ष व माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रतिमापूजन व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक ए.जी.पाटील,वसंतराव पन्हाळकर ,पैलवान नितीन दिंड,सुप्रसिद्ध चित्रकार संपत नायकवडी ,योगेश चव्हाण ,पर्यवेक्षक एम.जे.शिंगे, एस.बी.भोसले, पी.बी.पाटील,निवासी विभागाचे प्रशिक्षक संभाजी पाटील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,निवासी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी निवासी विभागातील रुद्र मोरे विरूद्ध रामराजे क्षीरसागर आणि चैतन्य लिमकर विरूद्ध सार्थक घुले या विद्यार्थ्यांचा कुस्तीचा उदघाटन सामनाही पार पडला. यावेळी गुलाबराव पोळ,नितीन दिंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख पी.आर.भोरे यांनी केले.