हातकणंगले विधानसभा मतदारसंघातुन पहिल्या दिवशी सोळा अर्जाची विक्री

    हातकणंगले विधानसभा मतदारसंघातुन पहिल्या दिवशी सोळा अर्जाची विक्री

     

    पेठ वडगांव (प्रकाश कांबळे):278 हातकणंगले अनुसूचित जाती राखीव विधानसभा मतदारसंघातुन अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी एकूण 9 इच्छुक उमेदवारानी 16 अर्ज खरेदी केले यापैकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने डॉ गणेश वायकर, बंडखोर पक्षाच्या वतीने शिवाजीराव आवळे यांनी तर अमरजीत रामचंद्र बंडगर, रामचंद्र दादू लोखंडे, इंद्रजीत आप्पासाहेब कांबळे, संदीप वसंत कांबळे, देवेंद्र नाना मोहिते, राजहंस तुकाराम भुजिंगे, उमेश दत्तात्रय भोरे या सात लोकांनी अपक्ष अर्ज खरेदी केला आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही अशी माहिती 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली.