ताराराणी पक्षाच्या वतीने महापालिका उपायुक्त दालनात ठिय्या आंदोलन
कुंभोज, प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाटपुराव्या मुळे नगरोत्थान योजनेतून 51.95 कोटी व विशेष रस्ता अनुदान अंतर्गत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या कामांसाठी दीड कोटी मंजूर केलेल्या आहे. या कामांसाठी आवश्यक असलेली एनओसी महानगरपालिका प्रशासनाकडून (नाहरकत दाखला) दिला जात नसल्याबद्दल कामे सुरु होण्यास विलंब होत आहे. याप्रसंगी ताराराणी पक्षाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनास जाब विचारत उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या दालनात ठिय्या मारला. त्यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने संताप व्यक्त केला. प्रशासनातील अधिकार्यांकडून ठराविक मक्तेदारांना कामे दिली जात असून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला. सुमारे तासभर हे ठिय्या आंदोलन सुरु होते. अखेर उपायुक्त काटकर यांनी, गणेशोत्सवापूर्वी महानगरपालिकेच्या अ, ब, क आणि ड या चार विभागातील पॅचवर्क कामांसाठी एकाऐवजी चार मक्तेदारांना कामे देण्यात येतील असे सांगितले.
यावेळी अहमद मुजावर, राहुल घाट, राजू बोंद्रे, तानाजी हराळे, दिपक सुर्वे, संजय केंगार, सतिश मुळीक, नितेश पोवार, इम्रान मकानदार, उदय धातुंडे, प्रितम गुगळे, राजेंद्र आरेकर, अक्षय बरगे, राजू देसाई, दिलीप चंगेडीया, सुबोध कोळी, फहिम पाथरवट, वसंत वेटाळे, सुखदेव माळकरी, विजय पवळे यांच्यासह ताराराणी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.