Home कोल्हापूर जिल्हा संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा “एक तपपुर्ती” कार्यक्रम मोठ्या उसाहत संपन्न 

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा “एक तपपुर्ती” कार्यक्रम मोठ्या उसाहत संपन्न 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा “एक तपपुर्ती” कार्यक्रम मोठ्या उसाहत संपन्न

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या एक तपपुर्ती कार्यक्रमात माझे मार्गदर्शन होत आहे. हे माझे परम भाग्यच म्हणवे लागेल असे उदगार “महाराष्ट्रातील युवा व्याख्याता, लेखक, ग्रामीण भागातील तरुणांचं नेतृत्व करणारा युवा कार्यकर्ता. व्याख्याते – श्री. गणेश शिंदे यांनी काढले”. संजय घोडावत इन्स्टिट्युटच्या प्रांगणात १२व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते श्री. गणेश शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, डॉ. विराट व्ही. गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisements

 

उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्याख्याते श्री. गणेश शिंदे म्हणाले शिक्षणासोबत अध्यात्मिक आणि तंत्रज्ञान जीवनाचा महत्वाचा विकास असून “जीवन सुंदर आहे” या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्यातले वेगळेपण शोधा म्हणजे जीवन सुंदर आहे याचा अर्थ कळेल. आपली आवड निवड संकल्पना आणि आपल्या उद्दिष्टेयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण निवडलेले करिअर डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या शिक्षणाचा कौशल्याचा उपयोग नोकरी शोधण्यात घालवण्यापेक्षा नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय सुरू करून उद्योगांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा त्यात स्वतःचे आणि देशाचे हित आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तंत्रज्ञान बदलत चालले आहे त्यासोबत आपणही वेळोवेळी बदलणे ही काळाची गरज आहे. श्री शिंदे मार्गदर्शन करताना उपस्थित हसता हसता त्यांच्या डोळ्यात कधी पाणी आले कळलेच नाही. मार्गदर्शनपर व्याख्यानात उपस्थित मंत्रमुग्ध होऊन स्वरचित सोशल मीडियावर गाजत असलेले कविता ‘राणी गाव सुटेना’ या कवितेवर सर्वांनी ठेका धरला होता.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायरेक्टर, डॉ. विराट गिरी यांनी केले. संजय घोडावत पॉलीटेक्निक ते इन्स्टिट्यूट या संस्थेचा १२ वर्षाचा प्रवास वर्णन व्यक्त्त केले. संस्थेचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या सर्वांचे मनपासून आभारव्यक्त करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील सक्सेस, पालकांचे सहकार्य, संस्थेच्या गुणवत्तेची दखल घेऊन संस्थेला मिळालेले विविध पुरस्कार, उच्च शिक्षणातील गुणवत्ता आणि दर्जावाढीसाठी ‘एनबीए’ मूल्यांकन प्राप्त सर्व विभाग, उत्कृष्ट, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या संकुलनात उपलब्ध असलेले अभ्यासक्रम विषयी माहिती देवून सर्वाना १२ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले यांनी उपस्थित सर्वांना १२ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन एसजीआय या शब्दाचा अर्थ “सेल्फ ग्रोथ” सांगून सक्सेसफुल मिळवणे या विषयावर विविध उदाहरणे देऊन उपस्थित्यांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर कॉम्पुटर सायन्स विभागाचे विद्यार्थी प्रणित भोसले ,नेहा पाटील, निकिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. भाग्यश्री भालकर यांनी मानले.

 

संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements