भक्तीमय वातावरणात खोचीसह परिसरातील सार्वजनिक गणपती बाप्पाला निरोप

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    भक्तीमय वातावरणात खोचीसह परिसरातील सार्वजनिक गणपती बाप्पाला निरोप

     

     

    खोची,(भक्ती गायकवाड):- पारंपरिक वादयांच्या निनादात, ढोल ताशांच्या गजरात हातकणंगले तालुक्यातील खोचीसह परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन भावपूर्ण वातावरण संपन्न झाले.बारा तासाहून अधिक विसर्जन मिरवणूक सुरू होती.येथील भैरवनाथ मंदिरा नजीक व खोची बंधाऱ्याजवळ श्री.वारणा नदीत सर्व मंडळांनी गणेशाचे विसर्जन केले.येथे पंचवीसहून अधिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूकीत सहभाग घेतला.तालीम संघ गजानन मंडळ,कै.जी.ए.पाटील युवक संघटना, कल्लेश्वर तरुण मंडळ या मंडळाने प्रथम विसर्जन करण्याचा मान मिळविला.परिसरातील गणेश मंडळांनी सकाळपासून मिरवणूकीस सुरवात केली होती.पहाटे चार वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती. शिवशक्ती तरूण मंडळ व ओंकार गणेश व भैरवनाथ ट्रॅक्टर ग्रुप या मंडळाने सर्वात शेवटी विसर्जन केले.

    Advertisements

    विसर्जन मिरवणूकीत शिवप्रेमी, तिरंगा मंडळ,तालीम संघ गजानन मंडळ, आनंद गणेश मंडळ,शिवशक्ती गणेश मंडळ,भैरवनाथ तरूण मंडळ, दसरा चौक तरूण मंडळ,न्यू दसरा चौक मंडळ, डी वार्ड गणेश मंडळ,हिंदवी ग्रुप,विश्वविनायक तरूण मंडळ, नुक्कड काॅर्नर गणेश मंडळ, सिध्दीविनायक गणेश मंडळ, वरदविनायक गणेश मंडळ,जयभारत गणेश मंडळ,पंचरत्न गणेश मंडळ, जीवनदीप तरूण मंडळ, के.टी.एम तरूण मंडळ,नृसिंह तरूण मंडळ, मोरया ग्रुप,अष्टविनायक तरूण मंडळ,मोरेश्वर,अजिंक्यतारा तरुण मंडळ यांनी विसर्जन मिरवणूकीत सहभाग घेतला.

    उत्सवकाळात तालीम संघ मंडळांनी ऐतिहासिक पावनखिंड हा सजीव देखावा, शिवशक्ती मंडळाने अली बाबा चाळीस चोर,मोरया मंडळाने संत बाळूमामा ही नाटिका सादर केली.विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. यावेळी वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलिस कर्मचारी, होमगार्ड,पोलिस पाटील मनोज सकपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements