हालोंडी येथे”चाइल्ड सिक्युरिटी व गर्ल्स हायजिन” कार्यक्रम संपन्न
हेरले / (प्रतिनिधी):- हिंदी दिन आणि भद्रबाहू स्वामी जयंती याचे वचित्य साधून ‘राजेंद्र विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल, हालोंडी’ यां शाळेने महिला पालक आणि विद्यार्थीनी साठी “चाइल्ड सिक्युरिटी व गर्ल्स हायजिन” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमची सुरुवात राष्ट्रगीत, फोटो पूजन, आणि दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमासाठी कोल्हापुरच्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. उज्ज्वला पत्की, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वर्षा डाळींबकर ( PSI ) निर्भया पथक, डॉ.सौ.स्वाती पाटील, सौ.निलम धनवडे कॉर्डिनेर, सखी महिला Helpline, शाळेच्या मुख्याधापिका सौ. लक्ष्मी गणेश व सौ.वासंती वागणे हे प्रमुख अतिथि उपस्थित होते. या कार्यक्रमात सन 2023-24 या वर्षातील विविध घटना व कार्यक्रमाचा संग्रह असणारे विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
या कार्यक्रमात मुलींसाठी सुरक्षा आणि स्वच्छता याचे महत्व या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मुलींच्या मासिक पाळी, शारीरिक बदल, बचाव आणि सुरक्षा, चांगले आणि वाईट प्रसंग ,जिल्हा विकास आणि बाल विकास योजना या बद्दलची माहिती व प्रश्नोंतरे पार पडली.
सूत्रसंचालन सौ. रूपाली माळी आणि सौ.भारती शिंगे यांनी केले. आभार सौ. श्रीजया नायर यांनी मानले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी कारण्या साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.