स्व.बी.टी.बेडगे गुरुजी यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर- महामंत्री डी.सी.पाटील 

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    स्व.बी.टी.बेडगे गुरुजी यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर- महामंत्री डी.सी.पाटील

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी( विनोद शिंगे):- श्री बाहुबली सेवकांची सहकारी पतसंस्थेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस एम जी शहा विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी मंगलाचरण व स्वागतगीत गाईले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थित बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील, संचालक गोमटेश बेडगे, बालविकासचे चेअरमन तात्यासाहेब अथणे, रवींद्र खोत,सचिव ऋषभनाथ मलिकवाडे, सहसचिव सुरेश चौगुले हे होते. पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सेवानिवृत्त सभासद व सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार करण्यात आला.

    Advertisements

     

    ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन रवींद्र देसाई म्हणाले की,”संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्वप्रथम सभासद व ठेवीदारांचा विश्वास व आपुलकी मोलाचे असून आतापर्यंत दाखविलेल्या अतूट विश्वासाबद्दल मी त्यांचे माझ्या सर्व संचालकाच्या वतीने हार्दिक आभार मानतो व त्यांनी यापुढे ही असाच विश्वास ठेवावा अशी अशा व्यक्त करतो. पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय बी टी बेडगे गुरुजी यांनी काळाची गरज ओळखून आपल्या सहकार्यासमवेत १९६७ साली आपल्या पतसंस्थेची स्थापना केली. धावत्या युगात आपले सहकारी मागे राहू नयेत त्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात हाच संस्था स्थापनेमागे त्यांचा उद्देश होता. आज सभासदांना घरबांधणी असो वा मुलांचे शिक्षण घेणे असो व इतर अडचणी असोत या सर्व गरजा पूर्ण होऊ लागल्या आहेत. सुरुवातीला एक बीज रूपात असलेली ही संस्था आज वटवृक्षाची उत्तुंग भरारी घेऊन समर्थपणे अद्यावत सोयीने संगणकीकृत झाली आहे ५७ वर्षाचा आलेख पाहिला तर नेहमीच या संस्थेच्या विश्वासास पात्र राहिली आहे अन् विश्वासाने चालवली जात आहे. असंख्य ठेवीदारांच्या व सभासदांच्या योगदानामुळे संस्थेला अहवाल सालात ३९ लाख ४६ हजार इतका निव्वळ नफा झाला असून सद्यस्थितीत काम करीत असताना सभासदांच्या अनेक अडचणी दूर केल्या आहेत”

     

    यावेळी व्हा.चेअरमन चंद्रकांत तेरदाळे, संचालक संजय तपासे, दादासो वाडकर, अरुण चौगुले,भैरू बागडी, श्रीमंधर वांजुळे, संतोष कुरूंदवाडे, सुजाता पाटील, पल्लवी पाटील, पद्मभूषण भरमगोंडा, अजित सुतार, प्रकाश शिंदे, स्नेहल पाटील, अनिल भोसले हे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव अनिल सांगावे यांनी अहवाल वाचन केले.

     

    आभार मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी मानले तर सूत्रसंचालन स्मिता निटवे यांनी केले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements