Home कोल्हापूर जिल्हा घोडावत विद्यापीठ लॉ विभागाचे 26 ऑगस्टला  ॲड.उज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन

घोडावत विद्यापीठ लॉ विभागाचे 26 ऑगस्टला  ॲड.उज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

घोडावत विद्यापीठ लॉ विभागाचे 26 ऑगस्टला  ॲड.उज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) : संजय घोडावत विद्यापीठात स्कूल ऑफ लीगल स्टडीज (लॉ) विभागाचे उद्घाटन 26 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील, पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी दिली.

Advertisements

नुकतेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घोडावत विद्यापीठाच्या लाॅ अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. स्कूल ऑफ लीगल स्टडीज विभागांतर्गत एल.एल.बी तीन वर्षे,बी.ए एल.एल.बी ऑनर्स व बी.बी.ए एल.एल.बी ऑनर्स 5 वर्षे पदवी अभ्यासक्रमांची सुरुवात झाली आहे.12वी नंतर या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

याविषयी बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले,की लाॅ विभागासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा येेथे उभारण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिकांसाठी मुटकोर्ट (प्रतिरूप न्यायालय) गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम, ग्रंथालय,अभ्यासिका, पात्र शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

चेअरमन संजय घोडावत

लॉ चे पदवी शिक्षण देणारे पश्चिम महाराष्ट्रातील एक दर्जेदार विद्यापीठ म्हणून आम्ही नावारूपाला येऊ. यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना देऊ. भारतातील नामांकित ज्येष्ठ विधीज्ञ व निष्णात कायदे पंडित ॲड.उज्वल निकम लॉ विभागाच्या उद्घाटनासाठी येत असल्याबद्दल आम्हाला आनंद होतोय.औं कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,लाॅ विभागाच्या संचालिका ॲड.डॉ.अंजली पाटील व टीम यासाठी कष्ट घेत आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements