Home कोल्हापूर जिल्हा उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव,उत्पादनात घट 

उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव,उत्पादनात घट 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव,उत्पादनात घट

 

 

बच्चे सावर्डे,(प्रतिनिधी सुनिल पाटील):- उन्हाळ्यात हुमणी, पावसाळ्यात पूर आणि आता उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. खतांचा मिरगी डोस टाकलेल्या को ८६०३२ जातीच्या उसावरच लोकरी माव्याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. पावसामुळे ऊस पडल्याने आणि उसाची उंची वाढल्याने कीटकनाशक – फवारणी करणे शक्य होत नाही. वेळेत • फवारणी झाली नाही तर माव्याचा प्रादुर्भाव वाढून ऊस उत्पादनात घट येण्याची भीती आहे. यंदा जोरदार पावसामुळे नदीला पूर आल्याने, नदीकाठच्या उसाची रया निघून गेली आहे. पुराच्या तडाख्यातून वाचलेल्या को ८६०३२ उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. साखर उतारा चांगला आणि चांगले उत्पादन मिळणारे को ८६०३२ उसाची जात असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांचा कल या उसाकडे आहे. प्रत्येक वर्षी माव्याचा प्रदुर्भाव होतो; परंतु यावर्षी उसावर मावा झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे जैविक पध्दतीचा वापर करावा असा सल्ला येथील शेतकऱ्यांनी दिला.

Advertisements

लोकरी मावा उसाच्या पानातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्याने उसाचे उत्पादन घटणार आहे. उसाची उंची वाढल्याने आणि ऊस कोलमडल्यामुळे कीटनाशकाची फवारणी करणे शक्य होत नाही. उसाला मिरगी डोस टाकल्यामुळे मावा वाढत आहे. वातावरणाच्या बदलाचासुद्धा परिणाम होत आहे. त्यामुळे उसाला खतांचा मिरगी डोस टाकताना नत्राचा डोस प्रमाणात टाकल्याने लोकरी माव्याचे प्रमाण वाढणार नाही, असं कृषी सहायक माधुरी पाटील. यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements